इसिए-डी.वाय.पाटील यांच्या सामंजस्य करार

0
पिंपरी : एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन (इसिए) आपल्या शहरातील सर्व शिक्षण संस्था सोबत पर्यावरण संवर्धन बाबतीत सातत्याने कार्यरत आहे. 06 फेब्रुवारी रोजी डी.वाय.पाटील कॉलेज, आकुर्डी महाविद्यालयासोबत पर्यावरण जनजागरसाठी सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य ए.वी.पाटील, स्थापत्य विभाग प्रमुख अमृता पाटील, यांत्रिकी विभाग प्रमुख के.एम.नारकर, पर्यावरण प्रकल्प संयोजक एस.कांबळे, प्रोफेसर मिथुन सावंत, इसिएचे संचालक विकास पाटील, पुरुषोत्तम पिंपळे, हिरामण भुजबळ, संभाजी बारणे आदींच्या साक्षीने महाविद्यालयाच्या कार्यालयात हा उपक्रम पार पडला.
महाविद्यालयीन पातळीवर स्वतंत्र पर्यावरण कक्ष स्थापन केला आहे. त्यासाठी महाविद्यालयाने जागा व हवी ती मदत उपलब्ध करून दिली आहे. सामंज्यस्य करार  सह्या करण्यावेळी महाविद्यालयात चालू असणार्‍या पर्यावरण पूरक कार्यक्रमांची संपूर्ण माहिती देण्यात आली. नजीकच्या कालावधीत कचरा महाअभियान तसेच रस्ता सुरक्षा जन जागरण सारख्या विषयावर, कचर्‍यात फेकलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा सदुपयोग, बांधकामात वाया गेलेले दगड, विटा, माती सारख्या वस्तूपासून झाडांच्या कुंड्यांची निर्मिती करण्याचा प्रकल्पप, पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून गणपती बनवण्याचा उपक्रम सर्वात उत्तम प्रकारे राबवण्यात येत आहे. महाविद्यालयामधील अनेक विद्यार्थी ह्या उपक्रमात आनंदाने सहभाग नोंदविण्यास पुढाकार घेत आहेत .