नवी दिल्ली-आज लोकसभेत मुस्लिम महिलांच्या हक्काच्या संरक्षणासाठी प्रस्तावित करण्यात आलेला ट्रिपल तलाक कायद्यावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. यावेळी कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी कट्टर इस्लामिक राष्ट्रामध्ये ट्रिपल तलाक पद्धतीवर बंदी आहे तर भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राज्यात का बंदी आणू शकत नाही? असे प्रश्न उपस्थित करत राजकारण बाजूला करत विरोधकांना ट्रिपल तलाक पद्धतीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
लोकसभेत त्यांनी ट्रिपल तलाकवर आपले मत मांडले.
दरम्यान यावर कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हा विधेयक अतिशय महत्त्वाचा असून यावर विस्तृत अभ्यास व्हायला हवे असे सांगत हा मुद्दा संवैधानिक असून यावर अभ्यास करण्यासाठी संयुक्त समिती नेमावी अशी मागणी केली.