भुसावळातील मुस्लीम बांधवानी दिले प्रांताधिकार्यांना निवेदन
भुसावळ- मंदसौर येथील सात वर्षीय बालिकेवर अत्याचार प्रकरणी आरोपी ईरफान याच्यावर गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला ईस्लामीक कायद्यानुसार भरचौकात फाशी द्यावी, अशा मागणीचे निवेदन भुसावळातील मुस्लीम समाजबांधवांनी प्रांताधिकारी यांना दिले. मंदसौर येथील सात वर्षीय बालिकेवरील अत्याचाराची घटना सामाजिक व्यवस्था भंग करणारी असून हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. यामुळे पोलिसांंच्या अटकेत असलेला आरोपीविरूद्ध गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला भरचौकात फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यता आली. तसे झाल्यास देशातील महिला व मुलींना सुरक्षिततेची हमी मिळेल व यापुढे असे गैरकृत्य करण्यास कुणीही पुढे धजावणार नाही, अशी मागणी निवेदनाद्वारे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना करण्यात आली. निवेदनावर हाजी साबीर शेख, फिरोज शेख, अब्दुल हकीम खान, डॉ.इम्रान खान, हकीम खान, अशरफ तडवी, सैय्यद सादीक अली, सद्दाम हुसेन खाटीक, मौलाना गुलाम सखर, सलीम नादर पिंजारी, शकील डी.डी. आदींच्या स्वाक्षर्या आहेत.