ईदगाह मैदानावर नवजात अर्भक आढळल्याने खडबड

0

भुसावळ। शहरातील  इदगाह मैदानाजवळ अज्ञात महिलेने एक दिवसांचे पुरुष जातीचे अर्भक फेकून दिल्याने गुरुवार 20 रोजी सकाळी 10 वाजता आढळून आले. या बाब परिसरात माहिती पडताच एकच खळबळ उडाली. इदगाह मैदानावर सकाळी 10 वाजेच्या सुमारास परिसरातील काही मुले क्रिकेट खेळत असताना त्यांना या मैदानाच्या बाजूस पडलेली गोणी हालचाल करताना दिसली. त्यामुळे यात साप वगैरे असल्याचा संशय आल्याने मुलांनी ही बाब अन्य नागरिकांना सांगितली.

बालकाची जिल्हा रुग्णालयात रवानगी
बाजूस असलेल्या रहिवाशांना याची माहिती मिळाल्यानंतर दानिश पटेल यांनी हि गोणी उघडून पाहिली असता यात लहान बालकाचा अर्भक असल्याचे दिसून आले. तेव्हा पटेल यांनी या अर्भकास आपल्या घरी नेऊन आंघोळ घातली. बाळ जिवंत असल्याने त्याबाबत नागरिकांनी बाजारपेठ पोलीस तसेच नगरपालिका रुग्णालयात माहिती दिली. त्यानुसार 108 क्रमांकाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. परिसरातील नागरिकांनी या अर्भकाला रुग्णवाहिका कर्मचार्‍यांच्या ताब्यात दिले. याबाबत दानिष नफीस पटेल (वय 30, रा. नवीन इदगाह कॉलनी, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरुन बाजारपेठ पोलिसात अज्ञात माते विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय मनोज पवार करीत आहेत. दरम्यान, बाजारपेठ पोलिसांनी अर्भकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.