शिरपूर। मुस्लीम समाजाचा पवित्र सण म्हणजे रमजान ईद हा सण काही दिवसावर येऊन ठेपला असून त्यानिमित्ताने मुस्लीम समाजाच्या महिलांनी इमिटेशन ज्वेलेरीला खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. या पवित्र सणामुळे मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. सध्या पवित्र रमजान महिनाचा अंतिम टप्पा आहे. सोमवारी रमजान ईद साजरा करण्याची शक्यता आहे. ईद निमित्ताने मुस्लिम महिला नवनवीन प्रकारच्या इंटिमेशनातून डायमंड स्टोनचे हार , डायमंड अंगुठी , पोत, क्लीप , रबर बँण्ड , पैजाब , पायल , डायमंड कळा , रंगीबेरंगी स्टोनाच्या बांगड्या , नाखूनकोन , मेहंदी आदी वस्तूंची खरेदी शिरपूर च्या वैष्णवी इमिटेशन ज्वेलेरीवर होत आहे.
मुस्लीम समाजात आनंदाचे वातावरण
वैष्णवी इमिटेशनात लहान मुलींच्या आकर्षक ज्वेलरी देखील उपलब्ध असल्याने ग्राहकांची पसंती वैष्णवी जनरल स्टोअरला आहे. रमजान ईदनिमित्त मुस्लीम समाजात आनंदी आनंदाचे वातावरण आहे. श्रीमंतापासून गरीबांपर्यंत मुस्लीम समाज हा सण आपापल्या परीने साजरा करतो व अनेक तर्हेच्या वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देतात. ईद काही दिवसावर आली असल्याने महिलांच्या गर्दीत वाढ होताना दिसून येत आहे. यानिमित्ताने व्यापार्यांची अर्थिक उलाढाल ही वाढली आहे.ईदच्या आदल्या दिवशी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याचे वैष्णवी जनरल स्टोअर चे गणेश जैन यांनी सांगितले. त्यामुळे अनेक ठिकाणाहून आकर्षक ज्वेलेरी व हँण्डबँग पर्स आणले जात आहे.