ईदनिमित्त राष्ट्रीय मानव अधिकार संस्थेतर्फे शिरखुर्म्याचे साहित्य वाटप

0

खिर्डी : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मानवाधिकार संस्थेचे राज्य उपाध्यक्ष संजय मोरे यांनी पुढाकार घेवून सिंगनूर, निंभोरा, वाघोदा व फैजपूर येथील मुस्लिम समाजातील गरीब गरजू कुटूंबांना शिरखुर्माचे साहित्य वाटप केले. लॉकडाऊन मुळे ग्रामीण, व शहरी भागातील सर्व सामान्य व अत्यंत गरीब होतकरू कुटुंबाला रोजगार नसल्याकारणाने अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाहचा प्रश्न गंभीर निर्माण झाला असून उपासमारीची वेळ आली आहे. अशातच सिंगनूर, ता.रावेर येथील रहिवासी असलेले सध्या भुसावळस्थित प्रा.संजय मोरे व परीवारातर्फे भीषण रमजान ईद निमित्त मुस्लिम समाजातील प्रतिकुल परीस्थिती उदरनिर्वाह करणार्‍या 31 कुटुंबांना जीवावश्यक वस्तूचे व अन्नदान स्वरुपात वाटप केले. आपल्या दोन्ही मुलांना व पत्नीला सोबत घेऊन आपल्या परीने शक्य तेवढी मदत ते करीत आहे. शिरखुर्म्यासाठी आवश्यक साखर, तुप, खारीक, काजु , खोबरे, मनुखा इत्यादी वस्तूंचे व्यवस्थित पॅकिंग करून वाटप वाटप करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी सुभाष पाटील, शे.फारुख शे.युनूस, मधुकर मोरे, करीम मणियार, कृष्णा सावळे, शे.माझिद शे.सादिक, सचिन सुरवाडे, पंढरीनाथ कोळी, शांताबाई मोरे, पूजा बोरसे, सनी मोरे, प्रज्ञारत्न मोरे, माया मोरे उपस्थित होत्या.