ईद निमित्त मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव !

0

नवी दिल्ली-देशभरात आज बकरी ईद साजरी केली जात आहे. त्या निमित्ताने दिल्लीच्या जामा मशिदीत आज सकाळी ईदचे नमाज पठण करण्यात आले. दरम्यान मान्यवरांकडून देशवासियांवर ईदच्या शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, आप नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आजच्या दिवशी आपल्या समाजातील सहानुभूती आणि बंधुभावाची भावना वाढेल अशी अपेक्षा बाळगतो, ‘ईद उल जुहा’ च्या शुभेच्छा असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे. तर देशवासियांना विशेषतः मुस्लीम बांधवांना ‘ईद उल जुहा’ च्या शुभेच्छा. आपल्या समाजात एकता आणि बंधुभाव टिकवण्यासाठी एकत्र मिळून काम करु असं आवाहन राष्ट्रपतींनी केले आहे.