नवापुर। जूलै महिन्यापासून नवापूर तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानातून ईपॉस प्रणाली मार्फेत शिधापत्रिका धारकांना धान्य वाटप करण्यात येणार असून सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता निर्माण होईल अशी माहिती जिल्हा पूरवठा अधिकारी विजयकूमार भांगरे यांनी येथील सू.ही.नाईक नगर भवनात ईपॉस प्रणाली संदर्भात आयोजीत प्रशिक्षण शिबिरात दिली.
कमी धान्य मिळाले ; तक्रार येणार नाही
यापूर्वी शहादा व नंदूरबार येथे या मशिन चे वाटप करण्यात आले असून या पूढे ऑनलाईन प्रणाली मार्फत शिधापत्रीका धारकांना त्याचा हक्काचे धान्य मिळेल त्यामुळे धान्य मिळालेच नाही कमी प्रमाणात धान्य मिळाले आशा तक्रारी येणार नाहीत. दूकानदाराना मशिन हाताळताना समस्या आल्यास लगेच निराकरण करण्याकामी व्यक्ती नियुक्त करण्यात आला आहे, अशी माहिती जि.पु.अधिकारी यांनी दिली. या प्रसंगी तहसीलदार प्रमोद वसावे, मिलींद निकम, रमेश वळवी, गवळी, सांळूखे कलाल आदी उपस्थितीत होते.
प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन मशिन वाटप
तालूक्यातील 180 स्वस्त धान्य दुकानापैकी 169 स्वस्त धान्य दुकानदारांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देउन पी ओ एस मशिन चे वाटप जिल्हा पूरवठा अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. ओयासीस सायबरनेटिक्स प्राईवेट कंपनी मार्फत हे मशिन पूरविण्यात आले आहेत. अन्न नागरी पूरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्रशासनाचा हा उपक्रम असून ओयासीस कंपनीचे नागपूर येथील संचालक राजेंद्र नजरबागवाले यांनी पी.ओ.एस मशिनद्वारे कशा पध्दतीने व्यवहार करावा याचे प्रशिक्षण स्वस्त धान्य दुकानदाराना दिले.