ईशांतच्या टाचेची दुखापत, रणजी फायनलमधून माघार

0

नवी दिल्ली । दिल्ली क्रिकेट संघाचा कर्णधार ईशांत शर्मा टाचेच्या दुखापतीमुळे 17 डिसेंबरला पुण्यात होणार्‍या रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळणार नाही. बंगाल विरूद्ध दिल्ली असा हा उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. श्रीलंकेविरूद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यामध्ये त्याच्या टाचेला दुखापत झाली होती. दक्शिण आफ्रिका दौर्‍याआधी या दुखापतीतून सावरणे गरजेचे आहे. नाहीतर याचा परिणाम खेळावर होण्याचीही शक्यता आहे. ईशांतच्या टाचेला दुखापत झाल्याने याचा परिणाम साऊथ आफ्रिका दौर्‍यावर होऊ नये असे त्याला वाटते, त्यामूळे ईशांतने विश्रांती घेतली आहे. त्याला न घेताच दिल्लीचा संघ पुण्यात दाखल झाल्यावर दिल्ली संघातील सदस्याने सांगितले.

रिषभ पंत कर्णधार
बीसीसीआयने नियमित कसोटी क्रिकेटपटूंना आपल्या राज्यासाठी रणजीत खेळण्याची परवानगी दिली आहे. इंशातच्या गैरहजेरीत रिषभ पंत दिल्ली संघाचे नेतृत्व करेल. भारतीय संघ 27 डिसेंबरला साऊथ आफ्रिकेसाठी रवाना होईल. तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. इशांत या संघाचा सदस्य आहे. त्याआधी इशांतला या दुखापतीतून बाहेर यावे लागणार आहे. इशांतने 116 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांमध्ये 366 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 79 कसोटी सामन्यामध्ये 226 विकेट घेतल्या आहेत.