मुंबई : बिग फॅट इंडियन वेडिंग मध्ये सध्या सोशल मीडियावर ईशा अंबानीच्या संगीत सोहळ्याची प्रचंड चर्चा सुरु आहे. ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा विवाह १२ डिसेंबरला होणार आहे. सोशल मीडियावर या संगीत सोहळ्याचे व्हिडिओ आणि फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. देश-विदेशातील प्रतिष्ठित लोक सहभागी झाले होते. तसेच संपूर्ण बॉलिवूड देखील उपस्थित होता असे म्हणणे चुकीचे नाही ठरणार.
अशातच एक फोटो समोर आला आहे. ज्यात शाहरुख आणि गौरी खान स्टेजवर डान्स करताना दिसत आहेत. या फोटोत शाहरुखने ब्लॅक शेरवानी परिधान केली असून तो गुडघ्यावर बसून गौरीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतोय. शाहरुख आणि गौरी शनिवारी प्रायव्हेट जेटने मुंबईहून उदयपूरला पोहोचले.