ईसीसी सोसायटीवर एनआरएमयुचे निर्विवाद वर्चस्व

0

निकालानंतर पदाधिकार्‍यांचा जल्लोष ; 27 तास मतमोजणी

भुसावळ- आठ जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र व सुमारे 300 कोटींची उलाढाला असलेल्या ईसीसी सोसायटी अर्थात रेल्वेच्या दि. सेंट्रल रेल्वे एम्प्लाईज को – आँपरेटीव क्रेडीट सोसायटी लि.वर पुन्हा नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने 35 पैकी 30 जागांवर विजय मिळविला. निकालानंतर पदाधिकार्‍यांनी ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला तर सुमारे 27 तास मतमोजणी चालली. सोसायटीसाठी बुधवारी निवडणूक झाल्यानंतर गुरुवारी सकाळपासून सुरू असलेली मतमोजणी मध्यरात्रीपर्यंत सुरूच होती. दरम्यान, बडनेरा येथे संतोष भटकर (एनआरएमयु) व राजेश नांदूरकर (सीआरएमएस) या दोन्ही जणांना समान 278-278 मते मिळाल्याने याबाबतचा निर्णय मुंबई येथे घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

हे उमेदवार झाले विजयी
भुसावळातील उमेदवारांमध्ये अरुण भास्कर धांडे, प्रकाश प्रेमचंद बेंडाळे, रवींद्र पंडीत भालेराव, विशाल निवृत्ती सपकाळे, राजेंद्र सीताराम साळुंके, शशीकांत दगडू मकासरे, लेखराजसिंह पी.राजपूत, वाल्मीक गंगाराम देहाडे, ललित रघुनाथ भारंबे, दीपक चेदर कागडा, अरविंद तुकाराम खंबायत, ओमपालसिंह तेजपालसिंह, रवींद्र काशीराम चौधरी, राजेंद्र रखमाजी निकम आणि पल्लवी सुनील अंबाडे हे शुक्रवारी विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. गुरूवारी सायंकाळी सुनील शेलार, कुंद महापात्रा, उमेश शेलार (नाशिक), अंबादास निकम, विलास मुलमुले, परवीन अहिरे, नितीन पवार (सीआरएमएस) (मनमाड), मिलींद खेडकर (नांदगाव), पुरूषोत्तम सोनवणे (सीआरएमएस, चाळीसगाव), प्रकाश जाधव (ट्रॅकमन असोशिएशन, पाचोरा), कुंदन जावळे, कीशोर कोलते (सीआरएमएस. पीओएच), पुपेद्र कापडे, देवांनद रजक, योगेश गुप्ता (खंडवा), संतोष चौधरी, संदेश पहूरकर, मोहंमद जहीर महंमद (अकोला) विजयी झाले. वरीष्ठ कार्मिक अधिकारी एन.डी. गांगुर्डे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर सहायक म्हणून संस्थेचे व्यवस्थापक प्रशांत रायमळे ै हे काम पहात होते, मंडळ कार्मिक अधिकारी एम.के. गायकवाड, सहायक कार्मिक अधिकारी राजेद्र परदेशी, एस.बी. रामटेके, विरेंद्र वडनेरे यांचे सहकार्य लाभले.