रावेर। गेल्या 1 जुलैपासून जिल्ह्यात ई-पॉस मशिनद्वारे रेशनचे वाटप होत आहे. रावेर तालुक्यात मात्र केवळ 30 टक्के दुकानदार ई-पॉसचा वापर करतात. त्यामुळे तत्काळ युनीट रजिस्टर भरुन तहसील कार्यालयात जमा करा. तरीही गांभीर्याने घेणार नसाल तर कारवाईला समोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशारा देत तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी रेशन दुकानदारांचे कान टोचले.
तहसीलदार ढगे यांनी तालुक्यातील रेशन दुकानदारांची बैठक घेतली. प्रामुख्याने ई-पॉस मशिनचा होत नसलेला वापर हाच बैठकीचा मुद्दा होता. निवासी नायब तहसीलदार सी.एच.पाटील, पुरवठा निरीक्षक तरसोदे उपस्थित होते. बैठकीत तहसीलदार ढगे यांनी रेशनकार्डमधील नावांची आधार जोडणी होत असल्याने आहे. मात्र, अनेकांकडे अद्यापही आधारकार्ड नाही. ही अडचण दूर करण्यासाठी तहसील कार्यालयात आधार नोंदणी कॅम्प लावणार असल्याचे सांगितले.