ई-बस’साठी दोनच निविदा

0

तीन वेळा मुदतवाढ देऊनही अल्प प्रतिसाद

पुणे : पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार्‍या वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे तब्बल तीन वेळा मुदतवाढ देऊनही 9 मीटर लांबीच्या बससाठी एक आणि 12 मीटर लांबीच्या बससाठी दोन कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या आहेत. याबाबत तांत्रिक तपासणी करण्याचे काम सुरू असून यानंतर अंतिम निर्णय होणार आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात पाचशे वातानुकूलित ई-बस भाडेकराराने घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. साधारणतः दोन महिन्यांपूर्वी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. वातानुकूलित ई-बसमध्ये पहिल्या टप्प्यात 150 आणि दुसर्‍या टप्प्यात 350 बसेस घेण्याचे नियोजन आहे. या बस ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट बेसिस (जीसीसी) या तत्त्वावर घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात घ्यावयाच्या 150 वातानुकूलित ई-बससाठीच्या निविदा 18 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली.