ई-रिक्षामधून अनेकांचा प्रवास सुकर!

0

जळगाव । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमात दंतेवाड्यातील स्वयंपुर्व झालेल्या आदिवासी महिलांनी ई-रिक्षाद्वारे रोजगार मिळविल्याबद्दल उल्लेख करून त्यांचे कौतूक केले. त्याचवेळी जळगावात जळगाव शहर मनपाने महिलांच्या स्वावलंबानाचा तिन दिवस बचतगटाचा एक मोठा कार्यक्रम सागर पार्कवर आयोजित केला होता. या कार्यक्रमात सुद्धा आरटीई सर्व्हीसतर्फे रिक्षावर चालक म्हणून नुतन शेवाळे व पुनम पाटील यांनी काम पाहिले.

उद्घाटन स्थळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, महापौर ललित कोल्हे यांनी याच रिक्षामधून प्रवास केला. तसेच तिन दिवसात जळगावकरांनी सुद्धा याचा आस्वाद घेतला. ई-रिक्षा या मलि चांगल्या प्रकारे चालवून आपला रोजगाराचा प्रश्‍न सोडवू शकतात.