पुणे : महापालिकेच्या शाळांमध्ये 24 कोटी रुपये खर्चून ई-लर्निंग बसविण्याच्या प्रस्तावाच्या मंजुरीवरून स्थायी समिती अध्यक्ष आणि आयुक्त यांच्यात वादावादी झाली. स्थायी समितीने हा प्रस्ताव मंजूर केला नाही तर थेट मुख्यमंत्रांकडून तो मंजूर करून आणून असे आयुक्तांनी अध्यक्षांना सुनावले.
महापालिकेच्या शाळांमध्ये ई- लर्निग यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. मात्र त्यासाठी तब्बल 24 कोटींचा खर्च येणार आहे. मात्र स्थायी समितीत त्यास विरोध झाल्याने गेल्या जवळपास महिनाभरापासून हा प्रस्ताव मंजुरीसाठी पडून आहे. या कामात पालिकेचे सात ते आठ कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामु़ळे तो मंजुर करता येणार नाही असे मोहोळ यांनी सांगितले. मात्र आयुक्तांनी त्यावर तुम्ही प्रस्ताव जरी मंजुर केला नाही तर मी थेट मुख्यमंत्र्याकडून हा प्रस्ताव मंजुर करून आणेल असेच आयुक्तांनी सुनावले. त्यामुळे या दोघांमध्ये काही वादीवादीही झाली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.