लोणावळा : विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आवड निर्माण होण्यासाठी तंत्रज्ञानाची सांगड घालुन शिक्षण देणे ही काळाची गरज असल्याचे मत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी पवनानगर येथे व्यक्त केले. नुकतेच येथील पवना विद्या मंदिर शाळा व लायन्स शांतामानेक ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम. आय. डी. सी. कडून ई-लर्निंग संच भेट देण्यात आला. यामध्ये इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या सर्व विषयांचा अभ्यासक्रम तसेच पुढील काळात कोणत्या क्षेत्रात जावे यासाठी करिअर मार्गदर्शनचची माहिती देखील आहे. यावेळी रोटरीचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, रोटरी क्लब अध्यक्ष सुनिल भोंगाडे, महेशभाई शहा, शंकर हादिमनी, दशरथ जांभुळकर, प्राचार्या प्रीती जंगले, पर्यवेक्षिका निला केसकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य प्रीती जंगले, सुत्रसंचालन सुवर्णा काळडोके, अलका आडकर तर आभार शिक्षक प्रतिनिधी सुनिल बोरुडे यांनी मानले.