उंटावदमध्ये दोन गटात हाणामारी : 23 जणांविरुद्ध गुन्हा

0

यावल : तालुक्यातील उंटावद येथे मुलीची बदनामी का करतो ? असा जाब विचारण्यास गेलेल्या भावासह मुलीला व तिच्या वडिलांना सार्वजनिक ठिकाणी एका गटाने शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी यावल पोलिसात एका गटातील आठ जणांविरुद्ध तर दुसर्‍या गटातर्फे देण्यात आलेल्या तक्रारीनुसार पहिल्या गटातील 15 संशयीत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पहिल्या गटाच्या तक्रारीनुसार आठ जणांविरुद्ध गुन्हा
उंटावद येथे 10 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उंटावद गावातील समीर मेहरबान तडवी, रोशन मेहरबान तडवी, गुलाब सायबु तडवी, कुरबान झिपरु तडवी, छबु बाबू तडवी व दोन महिला यांनी फिर्यादीच्या घरासमोर सार्वजनिक ठिकाणी अभय सुभाष पाटील यांच्या घरासमोर पाटील हे गेल्यानंतर मुलीची बदनामी का करता, असे बोलण्यास गेले असता याचा राग येऊन संशयीत आरोपी यांनी फिर्यादी व त्यांच्या वडिलांसह बहिणीस शिवीगाळ दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी पोटावर व छातीवर बागळीवर दगड, विटा फेकून मारून कुटुंबास दुखापत केल्याने त्यांच्याविरुद्ध यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसर्‍या गटातर्फे तक्रार : 15 संशयीतांविरुद्ध गुन्हा
या प्रकरणी दुसर्‍या गटानेही तक्रार दिली. उंटावद येथील संशयीत आरोपी अभय सुभाष पाटील यांनी रोशन मेहरबान तडवी यास सांगितले की, तुझ्या भावाला सांगून दे, पे्रम संबंध ठेवू नये, असे बोलण्याच्या कारणावरून संशयीत आरोपी सुभाष एकनाथ पाटील, अभय सुभाष पाटील, निलेश राजेंद्र पाटील, पप्पू सुनील पाटील, पंकज कैलास पाटील, अमोल कैलास पाटील, लोकेश सुधाकर पाटील, कमलेश कैलास पाटील, जितेंद्र सुधाकर पाटील, सागर साळुंखे, राहुल रवींद्र पाटील, योगेश अनिल पाटील, पंकज ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्र हिलाल पाटील व एक महिला यांनी फिर्यादीच्या घरासमोर सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर मंडळी जमवत फिर्यादी रोशन मेहरबान तडवी या सविटांनी मारहाण करून जखमी केले. यासंदर्भात स्टेशनला दोन्ही गटातील 23 लोकांविरुद्ध परस्पर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार अजीत हमीद शेख, पोलिस कर्मचारी सुनील सोपान तायडे करीत आहेत.