उघड्यांवर मांस विक्री करणाऱ्या आठ जणांवर कारवाई

0

मास्टर कॉलनी भागात मनपा पथकाची कारवाई
जळगाव – शहरातील मास्टर कॉलनी भागात शुक्रवार 21 सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मनपाच्या आरोग्य आणि अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे कारवाई करून अवैधरित्या मांस विक्री करणाऱ्या 8 विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून मांसविक्रीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. या कारवाईमुळे तांबापुरा, मेहरूण परिसरातील रजा कॉलनी, शेरा चौक, मास्टर कॉलनी भागातील मांस विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून खळबळ उडाली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात आठ विक्रेत्यांवर मुंबई पोलीस अधिनियम कलम 102/105 चे उल्लंघन 117 प्रमाणे कारवाई करण्यात आली.

या आठ विक्रेत्यांवर केली कारवाई
युनुस खान अब्दुल रहेमान, रईसखान युसुफखान, अनिस खान युनुस खान, समरीखॉ मेहबुब खॉ चौघे रा. भिलपूरा बालाजी पेठ, मेहूमुद खाँ पिरखॉ रा. छोटी मिल्लतच्या मागे, अक्सानगर, शेख शकली शेख रशीद, सादिक शेख हनिफ, शेख आकिफ शेख आरिफ तिघे रा. उमर मस्जिदच्या शेजारी, मास्टर कॉलनी. असे आठ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक सुनिल आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पोहेकॉ जितेंद्र पाटील, पोना सचिन मुंढे, पोना विजय पाटील, पोकॉ किशोर पाटील, पोकॉ हेमंत काळसकर, पोकॉ मुद्दस्सर काझी यांच्यासह होमगार्ड व जळगाव शहर पालिका अतिक्रमण विभाग व आरोग्य विभाग यांनी कारवाई केली.