उघड्यावर मास विक्री करणार्‍यांवर कारवाई

0

जळगाव । नगरसेविका सुभद्रा नाईक व नरसेवक इकबालुद्दिन पिरजादे यांनी अक्सा नगर भागातील ईकबाल कॉलनी येथे उघड्यावर मास विक्री होत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीत मास विक्री करणार्‍या विक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली होती. यानुसार आरोग्य विभागातर्फे बुधवारी मांस सकाळी 10 वाजता मास विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.

नगरसेवकांनी केली होती तक्रार
पथकास उघड्यावर मांस विक्री करणारे जावेद कुरेशी, नाजीम एम. कुरेशी, सत्तार कुरेशी, मुख्तार कुरेशी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई आरोग्याधिकारी डॉ. विकास पाटील यांच्या पथकाने केली. पथकास अक्सा नगरातील भागातील ईकबाल कॉलनी येथे नाल्यावरील पुलाजवळ उघड्यावर मास विक्री सुरू आढळून आल्याने बुधवारी सकाळी 10 वाजता ही कारवाई करून ही दुकाने बंद करण्यात आली. या चारही विक्रेत्यांकडून पथकाने हमी पत्र लिहून घेतले आले आहे. या हमीपत्रांत असे कृत्य केल्यास पोलीसात गुन्हा दाखल करण्यात येईल येतील या आशयाचे लेखी हमीपत्र लहून घेण्यात आले. मांस विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानासमोर गटारीवर ओटे बांधले होते. ते अतिक्रमण काढण्यात आले आहे. याप्रसंगी अतिक्रमण अधिक्षक एच. एम. खान, आरोग्य अधिक्षक भगिरथ नंदु सरसीया, मटन मार्केट लिपीक व अतिक्रमण विभागातील कर्मचारी साजीद अली आबीद अली, हरी सोमा सोनवणे, शांताराम विठ्ठल सोनवणे, सलमान भिस्ती, सोपान पाटील यांनी अतिक्रमण काढण्याची कारवाई केली.