मुक्ताईनगर- तालुक्यातील उचंदे येथील जिल्हा परीषद शाळेच्या भिंतींसह फळे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. सुमारे पाच वर्षांपूर्वी या गावची मुले शेजारच्या गावच्या शाळेत जायची. आज या शाळेत इंग्रजी शाळेचे विद्यार्थी आनंदाने दाखल होत आहे. ही कमाल केली शाळेचे मुख्याध्यापक तथा साहित्यिक अ.फ.भालेराव यांनी व त्यांच्या सहकार्यांनी. शाळेत झाड नव्हते मात्र आत हेच झाड जगवण्यासाठी विद्यार्थी धडपड करीत आहेत. यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी योगदान देत असून गावातील शिक्षणप्रेमीही सहकार्य करीत आहेत. शाळेत मुला-मुलींचे वाढदिवस महापुरूषांची जयंतीनिमित्त वक्तृत्व, निबंध स्पर्धा घेवून विद्यार्थ्यांचा हुरूप वाढवला जातो. शाळेत सुविचार प्रकल्प सुरू आहे. शाळेला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहे. विशेषत: मुक्ताईनगर विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुभाष नेवे यांच्यासह तत्कालीन निरीक्षक अशोक कडलग , तहसीलदार शाम वाडकर, पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाने, जिल्हा परीषद सदस्य वैशाली तायडे, गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे, केंद्र प्रमुख संजय ठोसर आदींचेही सहकार्य लाभले.