मुक्ताईनगर- तालुक्यातील उचंदा येथे भिमस्टार फाऊंडेशनतर्फे आयोजित विवाह सोहळ्यात 36 जोडपे विवाह बंधनात अडकले. सोहळ्यात शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, भाजप तालुका सरचिटणीस संदीप देशमुख, उचंदे सरपंच शशिकला पाटील, पुरनाड सरपंच प्रा.मनिषा देशमुख, जिल्हा मराठा शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष विरेंद्र भोईटे, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुका संघटक महेंद्र मोंढाळे, चेतन पाटील, संतोष कोळी, भीस्टार फाऊंडेशनचे दीपक इंगळे, साधना शेजोळे, उज्ज्वला जाधव, एन.जी.शेजोळे, प्रा.संजीव साळवे आदी उपस्थित होते.
सामुहिक सोहळे काळाची गरज
शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी सामूहिक विवाह सोहळे ही काळाची गरज असल्याचे सांगत प्रत्येक जाती-धर्मात अशा सोहळ्यांचे आयोजन करायला पाहिजे, असे सांगत उचंदे येथील विवाह सोहळ्यातील 36 नवविवाहित दांपत्यांना संसारोपयोगी साहित्य भेट दिले. यशस्वीतेसाठी महेंद्र हिरोळे, गजानन सुरवाडे, विक्रम हिरोळे, नितीन जाधव, संतोष झनके, मिलिंद पानपाटील, कुणाल गवई , राहुल लहासे, संदीप इंगळे, राहुल मोरे, जितेंद्र भालेराव, निलेश शेजोळे, एस.बी.इंगळे, किरण इंगळे तसेच भीमस्टार फाऊंडेशनच्या सदस्यांनी परीश्रम घेतले.