जळगाव। शि क्षण विभागाच्या बदली प्रक्रियेस मे महिन्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात करण्यात आली. साधारण जुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यत ही बदली प्रक्रिया सुरु राहणार आहे. शिक्षकांच्या बदलीसाठी शासनाने 26 फेबु्रवारी 2016 रोजी नवीन शासन निर्णय जारी केले होते. नवीन शासन निर्णयाप्रमाणेच शिक्षक बदली होणार आहे. शिक्षक बदलीची नवीन प्रक्रिया क्लिष्ट असल्याने शिक्षक संघटनांनी बदली प्रक्रिया रद्द करण्यात यावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. अखेर शिक्षक संघटनेच्या मागणीला यश आले असून शिक्षक बदली प्रक्रियेस 16 जुन पर्यत स्थगिती देण्यात आली आहे. मुबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती.
वर्गवारीमुळे बदल्या ’अवघड’
सरकारने शिक्षकांच्या बदल्यांचे नवीन धोरण जाहीर करताना अवघड सर्वसाधारण क्षेत्र अशी वर्गवारी करण्याचे आदेश दिले. प्रशासनानेही स्थळ पाहणी केली. त्यात जिल्ह्यातील 159 अवघड शाळा अवघड क्षेत्रात असल्याचे घोषितही केले आहे. मात्र यात आता काही शाळा तपासल्या नसल्याच्याही तक्रारी होत्या. 31 मे बदली प्रक्रिया सुरु करण्याची शेवटची मुदत होती. अकरा दिवसात शिक्षक बदली प्रक्रिया होईल का, याबाबत शिक्षकांमध्ये चिंता वाढली होती.
संपुर्ण राज्यात हीच अवस्था
संपुर्ण राज्यातील शिक्षकांच्या बदली ही अवघड व सोपेक्षेत्र निहाय करण्याचा शासन निर्णय होता. संपुर्ण राज्यभरातील शिक्षकांच्या या बदलीस विरोध होता. ऑनलाई, अवघड सोपे क्षेत्र सर्वेक्षणातील घोळ यामुळे राज्यातील सर्वच शिक्षक संघटनानी याचा विरोध केला होता. शासनाच्या वतीने उपसचिव भालेराव यांच्यासह 5 अधिकार्यांनी तर शिक्षकांच्या वतीने खाजगी वकील दिक्षीत यांनी कामकाज पाहिले.
ऑनलाईनमुळे अडचण
जिल्ह्यांतर्गत बदल्या 31 मेपर्यंत करण्याचे निर्देश होते. आता जिल्हांतर्गत बदल्याही ऑनलाईन करण्याचे शासनाचे नियोजन होते. शिक्षक बदल्या ऑनलाईन करायच्या की नेहमी प्रमाणे या विषयी अद्याप शासनाने कोणताही निर्णय दिलेले नव्हते. त्यातच अवघड सर्वसाधारण क्षेत्राचा घोळ संपलेला नव्हता. यामुळे या बदल्या नेमक्या राज्यस्तरावर होणार की जिल्हा परिषद स्तरावर याबाबत अजूनही संभ्रमावस्था शिक्षकांमध्ये होती. वेब पोर्टल ठप्प झाल्याने आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन करताना चांगलीच दमछाक होत होती.