चाळीसगाव – येथील भास्कराचार्य यूसिमास ऑबकस ॲकेडमीचा विद्यार्थी उत्कर्ष राजेश चौधरी याने गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे झालेल्या बौध्दीक प्रश्नांवली परीक्षेत अवघ्या आठ मिनिटांच्या वेळेत उत्कर्षने दोनशे गणिते सोडविल्याने त्याची नॅशनल मेरिट चॅपियन शिप देऊन गौरविण्यात आले आहे. तो ग्रेस इंग्रजी अॅकेडमीचा चौथीचा विदयार्थी आहे, तर एस.टी.महामंडळाचे वाहक राजेश चौधरी व सामाजिक कार्यकर्त्या निकिताताई चौधरी यांचा मुलगा आहे. त्याच्या यशाबद्दल भास्कराचार्य इंग्लिश स्कूलचे संस्थापक प्रा उमाकांत ठाकूर, प्राचार्या प्रा.श्रध्दा ठाकुर, शिक्षिका सुनीता भोसले, सिंधुबाई चौधरी, नारायण चौधरी, मोनाताई चौधरी, मनीषा चौधरी यांचेसह नातेवाईक व सर्वत्र अभिनंदन होत आहे.