उत्कृष्ट कार्याची दखल : फैजपूर प्रांताधिकार्‍यांचा जिल्हाधिकार्‍यांकडून सन्मान

रावेर : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाभरात उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम केल्याबद्दल फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला. मतदार दिनानिमित्त प्रशासकीय यंत्रणेमार्फत कडलग यांनी मतदार जनजागृती संदर्भात कार्यक्रम यशस्वीरित्या राबविले होते.

उत्कृष्ट कार्याची जिल्हाधिकार्‍यांकडून दखल
12 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रावेर व यावल तालुक्यात प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी उकृष्ट काम केले. यामध्ये युवक मतदारांसाठी नोंदणी अभियान राबवणे, मतदान संदर्भात जनजागृती करणे इत्यादी कामे उकृष्ट राबविल्याबद्दल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दखल घेऊन त्यांना उकृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून सन्मान केला. उत्कृष्ट सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून तहसीलदार उषाराणी देवगुणे, उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून साजीद तडवी, उत्कृष्ट मतदार डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून विक्रम राठोड यांचाही सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबतची यादी जाहीर करण्यात आली.