डीआरएम आर.के.यादव यांनी दिले पारीतोषिक : भविष्यात आणखी चांगल्या कामाची अपेक्षा
भुसावळ- भुसावळ रेल्वे विभागातील 25 रेल्वे कर्मचार्यांचा डीआरएम आर.के.यादव यांच्या हस्ते पारीतोषिक व प्रशस्तीपत्र देऊन बुधवारी डीआरएम कार्यालयात गौरव केला. रेल्वे सेवेत आणखी चांगल्या कामांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. रेल्वे तिकीट निरीक्षकांसह वरीष्ठ व मुख्य तिकीट निरीक्षकांनी विना तिकीट प्रवास करणार्या प्रवाशांकडून दंडाच्या वसुलीसह प्रवाशांचे हरवलेले सामान परत करून रेल्वेचा गौरव वाढवल्याने त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.
या कर्मचार्यांना मिळाला अॅवॉर्ड
बुकींग क्लर्क एस.पी.शेळके, मिलिंद साळुंके, वरीष्ठ तिकीट निरीक्षक उमेश काळोसे, व्ही.टी.मसराम, आर.के.गुप्ता, विनय ओझा, एम.एम.शिंदे, आर.के.केसरी, मेहबूब जंगलू, अनिल कचरे, अमित शर्मा, पियुष कुमार, संजीव शाम जाधव, ए.एम.खान, राजपाल सिंग, धीरज कुमार, एस.एन.खान, पी.एम.पाटील, एम.पी.नझरकर, योगराज रमेश न्हावकर, मुख्य तिकीट निरीक्षक पी.एच.पाटील, जे.के.शर्मा, एस.के.दुबे, एम.बी.सोरटे, तिकीट निरीक्षक हिरालाल राम,
चांगल्या कार्याचा गौरव -डीआरएम
रेल्वे प्रवाशांच्या हरवलेल्या वस्तू त्यांना प्रामाणिकपणे परत करून रेल्वे विभागाची मान उंचावणार्या तसेच विना तिकीट प्रवास करणार्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करून रेल्वेच्या उत्पन्नात भर घालणार्या कर्मचार्यांचा गौरव करण्यात आला. अशाच पद्धत्तीने रेल्वे कर्मचार्यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावून प्रवाशांना अधिकाधिक सेवा देणे गरजेचे असल्याचे व ते रेल्वेचे ब्रँण्ड अॅम्बेसेडर असल्याचे भुसावळ विभागाचे डीआरम आर.के.यादव यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.