उत्कृष्ट खेळाडू होण्यासाठी सातत्याची जोड देणे आवश्यक

0

** प्रा. डॉ. नितीन प्रभुतेंडोलकर यांचे प्रतिपादन     
जळगाव । येथील अरूणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविद्यालयात एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेंचा बक्षिस वितरण समारोह आयोजित करण्यात आला होता. या समारोहाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मानद सचिव प्रा. ए. पी. चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून एसएनडीटी महिला विद्यापीठाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. नितीन प्रभुतेंडोलकर उपस्थित होते. श्री. प्रभुतेंडोलकर यांनी उत्कृष्ट खेळाडू होण्यासाठी मेहनत, चिकाटी, जिद्द त्याचबरोबर त्याला सातत्याची जोड देणे आवश्यक आहे. यासोबत विनम्रता व खिलाडीवृत्ती सारखे गुणही महत्त्वाचे असल्याचे सांगितले. यावेळी विचारमंचावर संस्थेचे अध्यक्ष जी. ई. पाटील, उपाध्यक्ष व्ही. वाय बेंडाळे, सी.एच. तळेले, संस्थेचे पदाधिकारी, नगरसेविका उज्वला बेंडाळे, प्राचार्या डॉ. जयश्री नेमाडे, उपप्राचार्य डॉ. किशोर नेहते, डॉ. सतीश जाधव, बिना पांड्या आदी उपस्थित होते. समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रकाश कांबळे, स्वागत व परिचय प्रा. माधव पाटील व आभार प्रा. डॉ. सतीश जाधव यांनी मानले.