उत्तराखंडातील भाविकांना सुखरुप आणा

0

जळगाव। बद्रीनाथ उत्तराखंड येथे दरळ कोसल्यामुळे मेहरुण परिसरातील 61 भावीक आडकुन पडल्याने त्यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी मा.जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना वंजारी समाजाच्या वतीने शनिवार 20 मे रोजी निवेदन देण्यात आले. वंजारी समाजाच्या वतीने मेहरूण परिसरातील भाविक हे संकटात असून त्यांना शासनाच्या वतीने मदत देण्यात यावी तसेच त्यांना सुखरूप जळगाव जिल्ह्यात आणावे.

स्थानिक प्रशासनाला संपर्क करून सहकार्याची भूमिका पार पाडावी असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी राजेंद्र घुगे पाटील, सोमनाथ पाटील, कैलास सांगळे,भुषण लाडवंजारी,विकास वंजारी, पितांबर भावसार, योगेश सानप, ज्ञानदेव महाजन, वैभव ढाकणे, ऋृषीकेश वाघ, दिपक पाटील, अक्षय ढाकणे, प्रकाश कराड, शुभम वंजारी, सुभाष पवार, मंगेश पवार, चेतन सानप, विशाल लाड, निलेश पाटील तसेच समाजबांधव उपस्थित होते.