पुणे : उत्पन्नवाढीसाठी पुणे महापालिकेने शहरातील काही मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतला असून त्यातुन पाचशे कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळेल, असा अंदाज गृहीत धरण्यात आला आहे.
मालमत्ता विक्रीच्या निधीतून शहरातील विकासकामे मार्गी लावण्यात येतील, असा दावा महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला आहे. मनपाला मिळणाऱ्या उत्पन्नावर मर्यादा आल्यामुळे विकासकामांसाठी निधी मिळणार का? असा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे उत्पन्नाच्या नवीन स्रोतांची चाचपाणी सुरू झाली असून त्याअंतर्गत मालमत्ता विक्री करण्यासंदर्भात गांभीर्याने विचार सुरू झाला आहे.
सध्या महापालिकेच्या शहरात मालकीच्या १० हजार सदनिका आहेत. त्यापैकी ३ हजार सदनिका मनपाच्या ताब्यात असून, १ हजार ५०० लहान-मोठय़ा सदनिका, गाळ्यांची विक्री करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.