शिरपूर । शिरपूर वरवाडे नगर परिषदेने महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा नियंत्रण कायदा 2006 चा अधिकाराचा वापर करुन प्लास्टीक बॅग उत्पादन, वापर, साठवणूक वितरण, विक्रेता यांच्या विरूद्ध महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये व निर्णयानुसार धडक मोहीम सुरु केली आहे. नरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडील प्लास्टीक निर्मूलन समितीने विविध ठिकाणी प्लास्टीक कॅरी बॅग विक्रेत्यांच्या दुकानात समक्ष पाहणी केली. शहरातील अनेक दुकानदार प्लास्टीक कॅरीबॅग विक्री करतांना आढळून आले. प्लास्टीक निर्मूलन समितीने आंबा बाजार, बहिरम मंदीर जवळ, धान्य बाजार पाचकंदील, लालबाग, भोई गल्ली, शिवाजी मार्केट या परिसरात भेट देऊन माल जप्त केला.
काटेकोर पालन करा
शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांनी सांगितले की, शिरपूर शहर कचरामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. सुंदर शहर व स्वच्छ शहर निर्माण होण्यासाठी नागरिकांसह व्यावसायिकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. यामुळे शहर प्लास्टीक मुक्त होण्यास सुलभ होईल. महाराष्ट्र शासनाने प्लास्टीक बंदीचा निर्णय काटेकोरपणे पाळण्याची सक्ती केली आहे. शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी सांगितले की, नियमबाह्य प्लास्टीक वस्तूंवर बंदी असतांनाही शहरातील काही भागात ही विक्री सुरु असल्याचे निर्दशनास आले आहे. यात अनेक व्यापारी यांचाही समावेश आहे. तरी प्लास्टीक उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण करु नये असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा 23 जून पासून प्लास्टीक उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण करण्यावर दंडात्मक कारवाई होईल.
अहवाल केला सादर
मुख्याधिकारी अमोल बागुल, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिम राबविण्यात येत आहे. पा.पु. पर्यवेक्षक जितेश पाटील, स्वच्छता निरिक्षक जितेंद्र अहिरे, सागर कुलकर्णी, आरोग्य सहाय्यक दिपाली साळुंके, पौर्णिमा पाठक, विद्युत पर्यवेक्षक राकेश वाडीले. आरोग्य लिपिक भटू माळी, प्लास्टीक निर्मूलन समितीचे सदस्य कैलास पाटील, प्रदीप गिरासे, भरत ईशी, भूषण पाटील यांनी मुख्याधिकारी यांना अहवाल सादर केला. विभाग प्रमुख पंकज महाजन, जगदिश बारी, मोहन जडिये, प्रमोद अहिरे, राजेंद्र बडगुजर, अनिल दंडवते, सचिन देसाई, निलेश शिरसाठ, विलास गुरव,किरण चव्हाण, सुनील बारी, चंदु चौधरी, याकुब पठाण, गणेश मोरे, राजेंद्र ठाकूर, विनय माळी, राजेंद्र चव्हाण, प्रवीण रणदिवे, आकाश सारसर, विलास मराठे, प्रकाश नगराळे यांचाही मोहीमेत महत्वपूर्ण सहभाग आहे.