उत्सवाचे पावित्र्य राखून पारंपरीक वाद्यांचा करा वापर

0

जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले : भुसावळ शहरात शांतता समितीची बैठक उत्साहात

भुसावळ- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून काढण्यात येणार्‍या मिरवणुकीचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी जयंती समितीची असून त्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे शिवाय आदर्श आचार संहितेचेही पालनही गरजेचे असून समाज कंटकांकडून काही प्रसंग उद्भवणार नाही याची काळजीही समित्यांनी घ्यावी व मिरवणूक शांतते पार पाडून नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी येथे केले. रेल्वेच्या रंगभवन सभागृहात गुरूवारी सायंकाळी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. उत्सवात डीजेला बंदी असल्याने पारंपरीक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

तर मोठे उद्योग निर्माण होतील -जिल्हाधिकारी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजातील सर्व घटकांवर उपकार आहेत. यासाठी जयंती शांततेत व आनंदात साजरी करावी तसेच परीसराची बेरोजगारीची ओळख हटविण्यासाठी प्रयत्न होत नाही तोपर्यंत आपली ओळख निर्माण होणार नाही, असे विचार जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, आपली ओळख बदलविण्यासाठी प्रयत्न करा यासाठी उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन त्यांनी करीत जयंती दरम्यान कायदा सुव्यस्थेचा प्रश्‍न उद्भवणार नाही याची याची स्वतःहून काळजी घ्या, असे सांगत त्यांनी मतदानाचा अधिकार प्रत्येकाने बजावण्याचे आवाहन केले.

यांची व्यासपीठावर होती उपस्थिती
व्यासपीठावर जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर, डीवायएसपी गजानन राठोड, तहसीलदार महेंद्र पवार, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, रीपाइंचे रमेश मकासरे, पीआरपीचे जगन सोनवणे, जनाधारचे गटनेता उल्हास पगारे, समिती अध्यक्ष बाळा सोनवणे, पोलिस निरीक्षक देविदास पवार, पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलिस बाळासाहेब ठोंबे आदी उपस्थित होते. बैठकीत रीपाइंचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, पीआरपीचे जगन सोनवणे, राजेश्री सुरवाडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, मनसेच्या रीना साळवी, वंदना चव्हाण, रमेश मकासरे, राजू डोंगरदिवे, पप्पू सुरळकर, प्रा.जतीन मेढे उपस्थित होते. प्रास्ताविक डीवायएसपी गजानन राठोड तर सूत्रसंचालन शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक दीपक गंधाले यांनी व आभार बाजारपेठ निरीक्षक देविदास पवार यांनी मानले.