उत्सव काळात शांतता भंग होऊ देऊ नका

0

नंदुरबार। जिल्हाधिकारी कलशेट्टी यांनी येणारे सण-उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात शांतता कमिटींची बैठकींचे आयोजन केले. नंदुरबार येथील बैठकीत सण उत्सव शांततेत साजरा करा. शांततेला गालबोट लागणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी. समस्या सोडविण्यासाठी प्रशासन स्तरावरून सर्वोतोपरी मदत करण्यात येईल यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी केले. पंचायत समितीच्या स्व. हेमलताताई वळवी सभागृहात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कलशेट्टी बोलत होते.

अधिकार्‍यांना दिल्या सूचना
त्यांनी नगरपालिका, वीज मंडळाचा अधिकार्‍यांना विविध सूचना केल्या. व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पाटील,स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोनि. गिरीश पाटील, वीज मंडळाचे अधिक्षक अभियंता आर. एम. चौहान, मुख्याधिकारी गणेश गिरी, कार्यकारी अभियंता अनिल पाटील, पोनि. दीपक बुधवंत, संदीप रणदिवे उपस्थित होते.

शांतता भंग करणार्‍यावर कठोर कारवाई करा
ज्या ठिकाणी शांतता नांदते तेथे झपाट्याने विकास होत असतो. शांतता प्रस्थापित ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावा. अगर जो कोणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत असेल त्याचा वर तात्काळ कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे यांनी दिला. बैठकीत वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता आर. एम. चौहान म्हणाले, वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले आहेत. तथापी काही मोठ्या तांत्रित अडचणींमुळे विद्युत पुरवठा बंद पडल्यास जनरेटर किंवा इन्वीटरची व्यवस्था गणेश मंडळांनी करून ठेवण्याचे सूचित केले. वीज पुरवठा संबंधी तक्रारींचे निरसन व्हावे यासाठी नियुक्त कर्मचार्‍यांचे नाव व मोबाईल क्रमांकाची यादी गणेश मंडळ वितरीत करण्यात आली. याप्रसंगी सुनील सोनार ,परवेज खान, गजेंद्र शिंपी, गजेंद्रसिंग राजपूत, अभिषेक राजपूत,बबन पाडवी, मोहितसिंग राजपूत,नरेश पवार,रोहित शाह,दिलीप शाह , सुमित सोनार यांच्यासह गणेश मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते व शांतता कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तळोदा हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतीक
तळोदा । तळोदा शहर हिंदू मुस्लिम एक्याच प्रतीक असून श्री गणेश उत्साहात साजरा करा मात्र मिरवणुकीत दिलेली वेळ मर्यादा पळून पोलीस प्रशासन सहकार्य करा असे आवाहन जिल्हा धिकारी मल्लीनाथ कलशेट्टी यांनी केले,शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते. तसेच यावेळी राजेंद्र डहाळे यांनी देखील मार्गदर्शन केलं. राज्यात काही भागात समाधान कारक पाऊस न झाल्याने बळीराजाला मदतीची गरज असून गणरायची वर्गणी बळीराजाला द्या असे आवाहन राजेंद्र डहाळे यांनी असे आवाहन तालुक्यातील गणेशभक्तांना केलं. गणेशोत्सव व बकरी ईद पार्श्वभूमीवर शांतता कमिटी बैठक प्रशासकीय इमारतीमध्ये झाली.

गणेश मंडळ पदाधिकार्‍यांची उपस्थिती
अध्यक्षस्थानी डॉ मल्लिनाथ कलशेट्टी हे तर पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, तहसीलदार योगेश चंद्रे, पंचायत समिती उपसभापती दीपक मोरे, नगरसेवक संजय माळी, अजय परदेशी, पंकज राणे, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र राजपूत, मुख्यधिकारी जनार्दन पवार, नगरसेवक गौरव वाणी, काँग्रेस कमिटी अध्यक्ष रोहिदास पाडवी, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश ठाकरे, निसार मकराणी, भाजयुमो अध्यक्ष शिरीष माळी, जगदीश परदेशी माजी जिल्हा परिषद सदस्य दिवाकर पवार, तालुका अध्यक्ष राजेंद्र राजपूत अदी उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. निसार मकराणी यांनी आपले मनोगत व्यक्त केल. यावेळी किसन कलाल, श्रीराम मगरे, सूरज माळी सचिन राणे, जितेंद्र कलाल, रसिकलाल वाणी, बापू पाटील, मालती वळवी, विनोद माळी, राजेंद्र पाडवी, आदींसह शांतता कमिटी सदस्य व गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.