गांजाला कायदेशीर परवानगी द्या, उदय चोप्राची मागणी

0

मुंबई: गेला काही काळ चित्रपटातून दूर असणारा उदय चोप्रा सध्या एका नव्या कारणामुळे चर्चेत आला आहे. उदयने केलेलं एट ट्विट सध्या सर्वांचच लक्ष वेधत आहे. मारिजुआना म्हणजेच गांजाला कायदेशीर परवानगी द्या अशी मागणी त्याने एका ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

‘माझ्या मते भारतात गांजाला कायदेशीर परवानगी देण्यात आली पाहिजे. सर्वप्रथम तर हा आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर त्यासाठी कायदेशीर परवानगी देण्यात आली तर त्यावर आकारल्या जाणाऱ्या करातून बराच नफाही मिळू शकतो’, असं ट्विट त्याने केलं. त्यासोबतच गांच्याचे वैद्यकीय फायदे असल्याचंही त्याने या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

त्याच्या ट्विटची अनेकानीं खिल्लीही उडवली. हा सर्व प्रकार पाहता उदयने पुन्हा एक ट्विट केलं. आपण गांजा किंवा अशा कोणत्याच प्रकारच्या पदार्थाचा वापर करत नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं.