उद्घाटनापुरताच हरभर्‍याची खरेदी, शेतकर्‍यांची निराशा

0

रावेर येथे पत्रकार परीषदेत माजी आमदार अरुण पाटील

रावेर– शासनाने हरभर्‍याची खरेदी केवळ उद्घाटनापुरताच केली त्यानंतर खरेदी बंद झाल्याने ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांच्या पदरी निराशा आली असून प्रशासनाने त्वरीत लक्ष देऊन तत्काळ खरेदी करण्याची मागणी माजी आमदार अरुण पाटील यांनी पत्रकार परीषदेत केली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये झालेल्या पत्रकार परीषदेत ते बोलत होते.

खरेदीबाबत शासनाचे आडमुठे धोरण
पाटील म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी हरभरा खरेदी करण्यास मुहूर्त मिळाला परंतु नंतर खरेदी बंद करण्यात आली. शासन हरभरा खरेदी करण्यास आडमुठे धोरण अबलंवत आहे, असे त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, बाजार समिती संचालक डी.सी.पाटील, गोंडू महाजन आदी उपस्थित होते.

तर राष्ट्रवादी आंदोलन छेडणार
शेतकर्‍यांकडून हरभरा नोंदणीसाठी 1 मार्चपासून नोंदणी सुरू आहे मात्र खरेदी मात्र थंड बस्त्यात आहे. एकूण उत्पन्नाची 25 टक्के अट रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली तसेच मागील मका, तुरी खरेदीची रक्कम शेतकर्‍यांना अद्याप मिळालेलीे नाही. जिल्हा बँकेने जिरायत किंवा बागायत कर्ज वाटपाचे धोरण स्पष्ट करावे व या सर्व मागण्यांवर विचार न झाल्यास राष्ट्रवादीतर्फे जनआंदोलन छेडण्याचा इशारा पदाधिकार्‍यांनी दिला.