मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांची एकत्रित संपती आज अधिकृत जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपत्ती अंदाजे 125 कोटी रुपये आहे.
उद्धव ठाकरेंकडे एकूण 3 बंगले आहेत. वांद्रे पूर्व कला नगर येथे मातोश्री बंगला आणि मातोश्रीच्या अगदी समोर बांधले जात असलेले नवे घर, कर्जत येथील फार्म हाऊसचा या संपत्तीत समावेश आहे. विविध कंपन्यांमध्ये भागीदारी आणि त्यांचे डिव्हिडंड असे ठाकरे यांच्या उत्पन्नाचे विविध स्रोत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे एकही वाहन नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पोलिसांमध्ये एकूण 23 प्रकरणांची नोंद आहे. ज्यामधील 12 रद्द झाल्या असून बाकीच्या खाजगी तक्रारी आहेत.