उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामुळे राम मंदिर होणार नाही: रामदास आठवले

0

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीत निवडणूक आलेल्या 18 खासदारांना सोबत घेऊन 16 जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. शिवसेनेच्या या दौऱ्याची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी खिल्ली उडवली आहे. ‘उद्धव ठाकरे यांना कितीही वेळा अयोध्येला जाऊ द्या, काहीही उपयोग होणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरच राम मंदिराची निर्मिती होईल’, असे आठवले यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले आहेत. लोकसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी कार्ला गडावरील एकविरा देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी खासदार आणि कुटुंबासह कोल्हापुरातील अंबाबाईच्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. आता ते १६ जूनला अयोध्येला जाऊन राम लल्लाचे दर्शन घेणार आहेत. या दौऱ्याची देशभरात चर्चा सुरू आहे. मागील वर्षी उद्धव ठाकरे यांनी ‘पहले मंदिर…फिर सरकार…’अशी घोषणा दिली होती. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविषयी रामदास आठवले यांना विचारल्यानंतर त्यांनी हा दौरा म्हणजे शिवसेनेच्या खासदारांना अयोध्या दर्शन घडवून आणण्यासाठीचा दौरा आहे, असे म्हटले आहे. उद्धव ठाकरे १० वेळा अयोध्येला गेले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही.