भुसावळ- गाडी क्रमांक 11094 व 11093 अप-डाऊन महानगरी एक्स्प्रेसला 6 सप्टेंबरपासून नांदगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. प्रायोगिक तत्वावर सहा महिन्यांसाठी हा थांबा असणार आहे. अप 11094 ही गाडी नांदगाव स्थानकावरून मुंबईसाठी सकाळी 8.15 वाजता सुटेल तर डाऊन 11093 महानगरी वाराणसी जाण्यासाठी पहाटे 5.22 वाजता नांदगाव स्थानकावरून सुटेल. रेल्वे प्रवाशांनी दखल घ्यावी, असे आवाहन भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी केले आहे.