मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार हे उद्या सकाळी ११ वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
विधानपरिषदेत अर्थ व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यानंतर विधानभवन प्रांगणातून ‘राज्य अर्थसंकल्प २०२० – २०२१ एक दृष्टीक्षेप’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा.यशवंत पाध्ये, अर्थ विश्लेषक श्रीकांत मोरे, माध्यम तज्ज्ञ जयू भाटकर आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.
महाविकास आघाडी सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्प असल्याने संपूर्ण राज्याचे याकडे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पातून काय मिळणार? याकडे नजरा लागल्या आहेत.