जळगाव-जिल्हा परिषदेत नोकरीला असलेलया कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासून मागण्या प्रलंबित आहे. मागण्या मान्य होत नसल्याने उद्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी एक दिवशीय लाक्षणिक संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या मंगळवारी ७ रोजी जिल्हा परिषदेचे कर्मचारी संपावर जाणार आहे. जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फेगडे, सरचिटणीस शकील देशपांडे, खजिनदार पी.आर.चौधरी यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली आहे.
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी या अगोदर अनेकवेळा विविध मागण्यासाठी निवेदने दिली आहे मात्र अद्याप निर्णय होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप आहे. एकंदरीत २३ मागण्यासाठी हे संप केले जात आहे. पंचायत समितीचे कर्मचारी देखील या संपात सहभागी होणार आहे.