जळगाव । एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे शनिवार 14 जानेवारी रोजी डॉ. अब्दुल रहेमान अंजारिया यांचे विवीध दहशतवादी संघटनांच्या दहशतवादा विरूद्ध व्याख्यानाचे आयोजन पोलीस अधीक्षक डॉ. जालींदर सुपकेर व अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले आहे. डॉ. रेहमान यांनी दहशतवाद विरोधात इस्लाम, पीस अँड वर्ल्डं रिलीजन या प्रबंधांवर पीएचडी पूर्ण केलेली आहे.
डॉ. अब्दुल रहेमान अंजारिया जागतिक दर्जांचे दहशतवाद विरोधात समाज प्रबोधनाचे व्याख्यान देणारे व्याख्याते आहेत. ते महिला सबलीकरण शिक्षण, सामुहिक विवाह, सायबर गुन्हे आणि राष्ट्रीय एकात्मते विषयी समाज प्रबोधन करतात.
डॉ. अब्दुल रहेमान अंजारिया हे आयसीस या जागतीक दहशतवादी संघटनेच्या विरोधात प्रबोधन करणारे व्याख्याते आहेत. तरी शहरातील सर्व नागरिकांनी डॉ. अब्दुल रहेमान अंजारिया यांच्या दहशतवादावरील व्याख्यानाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. जालींदर सुपेकर यांनी केले आहे.