जळगाव । धनगर समाज उन्नती मंडळ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 292 व्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन धनगर वाडा, तांबापूरा येथे 31 मे रोजी सायंकाळी 7 वाजता आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष वसंत भालेराव होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्यासह धनगर समाजातील मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्याहस्ते सन्मान
एम.आय.डी.सी.पोलीस ठाण्याचे सुनिल कुर्हाडे ,पोलीस निरीक्षक सुर्यवंशी साहेब, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रदीप पाटील, संतोष धनगर, डॉ. संजय पाटील, लाला पाटील, रमेश सुशीर, महेंद्र सोनवणे, टी.बी. पांढरे, डॉ विनोद पाटील, गणेश हटकर, समाधान हटकर आदी उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मार्ल्यापण करण्यात आले.याप्रसंगी मान्यवरांनच्या हस्ते सदाशिवराव ढेकळे यांना यंदाचा समाजसाधना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आभार डॉ. विनोद पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. विनोद पाटील, गणेश हटकर, लाला पाटील, रमेश सुशीर, वसंत भालेराव, पंडीत महाराज, कडू हटकर, राजधर हटकर, बापू हटकर, अशोक हिवराळे, संजय ढेकळे, शरद पांढरे, विजय पांढरे, टी.बी.पांढरे, विलास देशमुख, राजू देशमुख, गजानन देशमुख, सुनिल देशमुख, बापूराव पानपाटील, के.टी.वाघ, शंकर जावळे, गिरीष भावसार, सुनंदा देवराज आदिंनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन डी.बी.पांढरे यांनी केले.