नंदुरबार । वेळावद येथे कृषी विभागाच्या वतीने उन्नत शेती समृध्द शेतकरी मोहीमे अंतर्गत शेतकरी सभा घेण्यात आली. या सभेतून शेती औजार अनुदान व कार्यपध्दतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नंदुरबार तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले यांच्या मार्गदर्शनाखाली उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी वेळावदचे सरपंच मोहन रामश्या वळवी होते.
माती तपासणी अहवालाचे वाटप ; विविध योजनांची दिली माहिती
याप्रसंगी धानोरा मंडळ कृषी अधिकारी बी.एम.पवार, वि.का.सोसायटीचे चेअरमन अर्जून जत्र्या वळवी, उपसरपंच योगेश पाटील आदी उपस्थित होते. कृषी सहाय्यक करणसिंग गिरासे यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड, गांडूळखत उत्पादन टाकी नॅडेप खत टाकी उभारणी व कापूस लागवड तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी बी.एम.पवार यांनी सुक्ष्मसिंचन योजना 2017-18 साठी लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज दि.31 डिसेंबर 2017 पर्यंत सादर करता येईल. अर्ज केल्यानंतर शेतकरर्यांना उपलब्ध अनुदानाच्या मर्यादेत ऑनलाईन पूर्वसंमती लागलीच देण्यात येईल. पूर्व समंती मिळाल्यापासून एक महिन्याच्या कालावधीत सुक्ष्मसिंचन संच बसविणे आवश्यक राहील व प्रस्ताव सर्व कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयास सादर करावा लागेल. तसेच जमिनीच्या आरोग्य पत्रिकेंतर्गत तपासणी अहवालानुसार शेतकर्यांना विशद करुन पिकनिहाय खताच्या मात्राविषयी मार्गदर्शन केले. सभेच्या शेवटी माती तपासणी अहवालाचे शेतकर्यांना वाटप करण्यात आले. तसेच कृषी यांत्रिकीकरणाचे अर्ज भरुन घेण्यात आले. सभेस अशोक मराठे, मोहन पटेल, भबूता पटेल, सुधाकर पाडवी, शांताराम वळवी, अनिल पटेल, सुभाष मराठे, दिनेश मराठे, गिरीष मराठे, राजेंद्र मराठे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. शेतकरी सभेचे आयोजन करणसिंग गिरासे यांनी केले होते.