उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी सीबीआयच्या रिमांडमध्ये

0

उन्नाव – सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या वडिलांवर मारहाण आणि आर्म्स अॅक्टचा बनावट गुन्हा नोंदविल्याप्रकरणी सीबीआयने एकाला अटक केली होती. यानंतर, आता याप्रकरणी आमदार कुलदीप सिंह सेंगरच्या इतर चार जवळच्या लोकांना आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीसह सर्व ५ आरोपी शुक्रवारपासून सीबीआयच्या रिमांडमध्ये आसणार आहेत. यातून अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.

आजपासून तीन दिवस कोठडी

उन्नाव बलात्कार प्रकरणात पीडितेच्या वडिलांना खोट्या गुन्ह्यात कारागृहात पाठवणे, स्थानिक पोलीस आणि भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यासाठी खरी डोकेदुखी ठरत आहे. याप्रकरणी सीबीआयने आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्या सांगण्यावरून खोटा गुन्हा लिहिणाऱ्या टिंकू सिंहला सर्वप्रथम अटक केली होती. आता सीबीआयने आमदार सेंगर यांच्या इतर चर जवळच्या मानसांनाही आरोपी बनवले आहे. विनीत सिंह, बऊवा, सोनू आणि शशी प्रताप सिंह उर्फ सुमन, अशी त्यांची नावे आहेत. शुक्रवारपासून तीन दिवसांच्या कस्टडी रिमांडमध्ये सीबीआय या सर्व आरोपींची चौकशी करेल.