उन्हाच्या तडाख्याने नागरिक बेहाल

0

जळगाव। शहर उत्साहाच्या कडाक्याने तापत असताना नागरिकांचे जीवन अधिक समस्या मय झाले आहे.जिल्ह्यात उष्मघाताचे एकूण आता पर्यत चार बळी गेले असून अनेक जणांना कडाक्याने दवाखान्याची उपचारसाठी वाट धरावी लागत आहे. रस्त्यावर वाहने चालविणे मुश्किल झाले असल्याने गरम हवेचे प्रमाण शहरात सर्वार्धिक वाढले आहे. यंदाच्या उन्हाळ्याचा मौसमात राज्यात जळगाव दुसर्‍या क्रमांकावर आहे. तापमानाचे प्रमाण शहरासह जिल्ह्यात अधिक असल्याने दुचाकीवर बाहेर निघणे मुश्किलीचे झाले आहे. सुट्या असताना विध्यार्थ्यांना बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आल्याने सगळ्याना कडकडत्या उन्हाने जिव्हारी आणले आहे. जळगावचे वाढते तापमान नागरिकांना आरोग्यसाठी धोक्याचे असतांना रोजच्या कामांचे दळणवळण सुरू आहे.

सकाळीच होतात कामे
वाढत्या उन्हाच्या तापमानाने सरकारी वर्ग ,क्लासेस ला जाणारे तसेच महाविद्यालयातिल कामे सकाळीच उरकवून घेण्यात येत आहे. रस्त्यावर वस्तू विक्री करणारे विक्रेते देखील सकाळीच दुकाने लावून आपले रोजगाराचे साधन भागवीत आहे. सकाळी 7 वाजे पासून शहरात सूर्यादाय होत असून सूर्य आग ओकत आहे. वाहने चालविताना गरम हवेचे प्रमाण वाढल्याने वाहने चालविताना नागरिकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक अपघाताचे प्रमाण वाढले असून वादाचे प्रकार यामुळे घडत आहे. प्रवास करताना डोळ्यांना त्रास होत असल्याने हे प्रकार नागरिकांना डोकेदुखी ठरत आहे.

पर्यावरण समतोल राखण्याची गरज
गेल्या काळात सर्वाधिक झाडे तोडण्यात आल्याने वाढते तापमानाचे प्रमुख कारण आहे. ग्लोबल वॉर्निंग वाढत असून यावर उपाय योजना करण्याची गरज आहे. 2017 मध्ये तापमानात जळगाव जिल्ह्याने पातळी गाठली. निसर्गाशी दोन हात केल्याने अशी परिस्थिती आज शहरात आहे. महापालिकेच्या वतीने वृक्षसंवर्धन मोहिम राबविण्याची गरज असल्याचे सुजाण नागरिकांकडून बोलले जात आहे. यामुळे शहरातील तापमान आटोक्यात राहण्यास मदत होणार आहे. सामजिक संस्थांनी देखील या मोहिमेस प्रतिसाद देण्याची गरज आहे.

ग्लोबल वॉर्मिंग कारणीभूत
जागतिक तापमानवाढ आटोक्यात आणण्यात वनांचा फार मोठा सहभाग असून लोकसंख्या तसेच औद्योगीकरणामुळे शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने वातावरणात जास्त प्रमाणात निर्माण झालेला कार्बन-डाय-ऑक्साइड हा ग्लोबल वॉर्मिंगसाठी कारणीभूत आहे. पृथ्वीला या महान समस्येपासून वाचवायचे असेल तर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वनसंवर्धन ही काळाची गरज आज बनली आहे. जळगाव शहरात देखील वृक्ष सर्वर्धन मोहीम राबविणे गरजेचे आहे.