चाळीसगाव । तालुक्यातील शेवरी येथील 18 वर्षीय महिलेने काही दिवसांपुर्वी विषारी औषध घेतले होते. आज शुक्रवारी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील शेवरी येथील सौ.साक्षी विनोद चौधरी (वय-18) हिने 8 नोव्हेंबर रोजी कोणतेतरी विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तीला उपचारासाठी शहरातील कृष्णा क्रिटीकल सेन्टर येथे दाखल करण्यात आले होते. आज अखेर 10.45 वाजता साक्षीचा उपचारादरम्यान कृष्णा क्रिटीकल सेंटर येथे मृत्यू झाला.