उपनगराध्यक्षांची वीज कर्मचार्‍याला मारहाण

0

बोदवड। साईनगर भागातील डीओ गेला असता उपनगराध्यक्ष नितीन चव्हाणसह दोन जणांनी उपकेंद्रातील टेक्निशियन निलेश रामकृष्ण राणे यास मारहाण केली.

महावितरण कंपनीच्या कार्यालयात उपनगराध्यक्ष नितीन चव्हाण यांनी दुरध्वनी केला की, साईनगरमधील डीओ गेला आहे, टेक्निशियन निलेश राणे यांनी डीपी नंबर सांगा, असे विचारले असता आरोपी उपनगराध्यक्ष नितीन चव्हाण म्हणाला की, मला ओळखत नाही का, थांब मी येतो, असे बोलून काही वेळातच टेक्निशियन निलेश राणे यास उपनगराध्यक्ष नितीन चव्हाण, भुषण भोई (रा. शारदा कॉलनी), अतुल भोई (रा. भोईवाडा) या तिघांनी मारहाण करुन शासकिय कामात अडथळा निर्माण केला.