उपराष्ट्रपतीपदी शपथ घेण्यापूर्वी नायडू यांनी वाहिली सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली

0

नवी दिल्ली | भारताचे 13 वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ ग्रहण करण्यापूर्वी व्यंकय्या नायडू यांनी राजधानीतील पटेल चौकात असलेल्या लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास आदरांजली अर्पण केली.

सरदार पटेल यांच्या स्मृतीत पुष्पांजली अर्पण करून त्यांनी राष्ट्रपती भवनात पद व गोपनीयतेची शपथ घेतली. तत्पूर्वी त्यांनी राजघाटावर महात्मा गांधी व त्यानंतर दीनदयाळ उपाध्याय यांनाही आदरांजली अर्पण केली.