उपसरपंचपदी कानिफ गव्हाणे

0

शिक्रापूर । निमगाव म्हाळुंगी ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेंद्र रणसिंग यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे या ठिकाणी निवडणूक घेण्यात आली. सरपंच चांगुणा काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली. यासाठी गव्हाणे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी विशाल ढसाळ यांनी जाहीर केले. पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग, शिक्रापूरचे माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांच्या हस्ते गव्हाणे यांचा सत्कार करण्यात आला. गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहून नागरिकांच्या अडचणी सोडवणार असून विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचे गव्हाणे यांनी यावेळी बोलताना सांगितले.