उपसरपंचांनी स्वखर्चाने बसवले स्ट्रीट लाइट

0

महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना दिलासा

वाघोली : वाघोली येथील बालाजी पार्क ते हिलशायर या रस्त्यावर स्वखर्चाने स्ट्रीट लाईट बसवण्यात आली. रात्रीच्या वेळी ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना अंधारामुळे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते, तसेच अपघाताचे प्रमाणही वाढले होते. यामुळे सर्वांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बालाजी पार्क ते हिलशायर रस्त्यादरम्यान असलेल्या अंधाराच्या साम्राज्यामुळे नागरिकांना मोठा सामना करावा लागत होता. रात्रीच्यावेळी विशेषतः महिलांना असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते. एका वृद्ध गृहस्थाला अपघातात जीव गमवावा लागला. याची गांभीर्याने दखल घेत वाघोलीचे उपसरपंच संदीप सातव यांनी दोन लाख रुपयांची तरतूद करून स्वखर्चाने स्ट्रीट लाइट बसवले तसेच रस्त्यावर पांढरे पट्टे मारल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिकांची मोठी सोय झाली आहे.