उपोषणकर्त्यांची खालावली प्रकृती

0

भुसावळ। ओरिएंट कंपनीला दिल्या जाणार्‍या फ्लाय अ‍ॅशप्रकरणी निंभोरा ग्रामपंचायतीचे पॅनल प्रमुख तथा सदस्य रामचंद्र पाटील आणि स्थानिक लोकाधिकार समितीने दत्तात्रय इंजिनिअरींग या कंपनीविरोधात महाराष्ट्र दिनापासून आंदोलन सुरु केले. याची दीपनगर प्रशासनाने अद्यापही दखल घेतली नसल्ययाने आंदोलन सुरुच असून बुधवार 3 रोजी आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी रामचंद्र पाटील यांची प्रकृती खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रशासन लक्ष देईना
ओरियंट कंपनीने 193 रुपये टनाप्रमाणे करार केल्यावरही गेल्या चार महिन्यांपासून मक्तेदार कंपनीला 170 रुपये प्रती मेट्रीक टन प्रमाणे देवून अ‍ॅशची उचल करीत आहे. ओरियंट कंपनीला पारस केंद्रातून 730 रुपये, बुटीबोरी येथून 1350 रुपये, गुजरातमधील ऊकाई विद्यूत केंद्रातून 1400 रुपये प्रमाणे राख मिळते. मात्र दीपनगर केंद्रातून 193 ऐवजी 170 रुपये प्रतीटन राख देण्याचे कारण काय.

त्यामुळे रामचंद्र तायडे यांनी चार महिन्यांपासूनचा सर्व दंड वसूल करण्याची मागणी करीत उपोषण सुरु केले आहे. तर स्थानिक लोकाधिकार समितीचे अध्यक्ष दीलीप पाटील पंकज चौधरी यांनी मे. दत्तात्रय इंजिनिअरींग या कंपनीबाबत माहिती अधिकारातून माहिती मागवली. या कंपनीमुळे संच क्रमांक गेल्या काळात 14 तास बंद होता. यामुळे 7.78 मिलीयन युनिटची निर्मिती रखडल्याने महानिर्मितीला भरपाई आणि सदर कंपनीला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी उपोषणकर्त्यांनी लावून धरली आहे.