उपोषणाच्या सातव्या दिवशीही प्रशासनाकडून दखल नाही

0

शिरपूर । तालुक्यातील बलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या शौचालय घोटाळ्यातील दोषींवर कार्यवाही व पात्र लाभार्थ्यांना अनुदान या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सरोज पाटील व माधव फुलचंद दोरीक हे 22 ऑगस्ट पासुन पंचायत समिती शिरपूर कार्यालया बाहेर आमरण उपोषनास बसले असुन आज त्यांचा उपोषनाचा सातवा दिवस आहे. उपोषणकर्त्यांची प्ऱकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने दखल न घेतल्यास उपोषणकर्त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. उपोषणकर्त्यांच 6 किलो वजनात घट झाले आहे. दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणीवर ठाम असल्यामुळे आंदोलन सुरुच ठेवले आहे. या बाबत जनतेस जागृती करण्यासाठी 28 रोजी डॉ.पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यात त्यांनी पंचायत समिती व जि.प. प्रशासनावर गंभीर आरोप केले आहे.